अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या 2025 च्या भाषणाचा एक महत्त्वाचा भाग रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) संपवण्यावर भर होता, ज्याला त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रमुख प्राधान्य म्हणून सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबविण्यासाठी करार केला जावा, असे विधान केले होते. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनीही त्यासाठी अनुकूलता दाखविल्याचे दिसत आहे.
व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) म्हणाले की, २०२० साली डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेपासून दूर ठेवले नसते तर युक्रेन युद्ध टाळता आले असते. माध्यमांशी बोलत असताना पुतिन यांनी ही भूमिका मांडली. ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले असते तर रशिया-युक्रेन संघर्ष पेटलाच नसता, असेही ते म्हणाले. पुतिन यांनी ट्रम्प यांची स्तुतीही केली आहे. (Vladimir Putin)
हेही वाचा-Pune Accident: नवले पुलावर कारची बसला धडक ; दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमी
पुतिन म्हणाले, “ते एक हुशार आणि व्यावहारिक व्यक्ती आहेत. जर २०२० साली ट्रम्प सत्तेत असते तर त्यांच्याशी चर्चा करून युद्ध थांबवता आले असते. तसेच युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पूर्वीपासूनच सामंज्यसाची भूमिका घेण्यास तयार होतो. आम्ही चर्चेसाठी तयारच आहोत, हे पुन्हा एकदा सांगत आहोत.” (Vladimir Putin)
हेही वाचा-पाच वर्षांत घरगुती विजेचे दर घटणार; BJP सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मात्र युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प-पुतिन चर्चेदरम्यान युरोपियन युनियनचाही सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. युरोपियन संघाशिवाय शांततेची चर्चा होऊ शकत नाही. युद्ध थांबविण्यासाठी व्यापक भागीदारीची आवश्यकता असल्याचे झेलेन्स्की (Zelensky) म्हणाले. (Vladimir Putin)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community