इंडी आघाडी, मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहादला मत; भाजपा आमदार Nitesh Rane यांचा हल्लाबोल

इंडी आघाडी आणि मविआला मत दिले तर देशात भगवे झेंडे फडकावण्यास परवानगी मिळणार नाही, नाक्यानाक्यांवर पाकिस्तानचे झेंडे दिसतील, असे नितेश राणे म्हणाले.

139

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत म्हणजे व्होट जिहादच्या समर्थकांना मत देण्यासारखे आहे. त्यामुळे इंडी आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहादला मत, अशी जळजळीत टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते.

कर्नाटक पॅटर्न देशभर राबवण्याचा इंडी आघाडी, उद्धव ठाकरे यांचा डाव

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नकली पुत्र आहेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका योग्यच आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, इंडी आघाडीच्या अन्य नेत्यांकडून वापरली जात असलेली भाषा धोक्याची घंटा आहे. कर्नाटक पॅटर्न देशभर राबवण्याचा इंडी आघाडी, उद्धव ठाकरे यांचा डाव लपून राहिलेला नाही. उद्धव ठाकरे हे मतांच्या लालसेपोटी मुस्लीम लीगची भाषा बोलू लागले आहेत.  सामनामधील मुलाखतीवरून आमदार राणे यांनी उद्धव ठाकरे, इंडी आघाडी आणि मविआला धारेवर धरले. सामनाच्या मुलाखतीतील “ही निवडणूक हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान अशी आहे” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून आमदार राणे यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठवली, असे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

(हेही वाचा Sanjay Raut: “राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी एवढ्या सभा घेतल्या असत्या तर…”, संजय राऊतांचे टीकास्त्र)

…तर नाक्यानाक्यांवर पाकिस्तानचे झेंडे दिसतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएचे सर्व घटक पक्ष हे राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशाला सुरक्षित ठेवण्याचा विश्वास जनतेला देत असतानाच दुसरीकडे धर्माच्या नावावर भाजपा आणि एनडीए विरोधी फतवे निघत आहेत. धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे फतवे हे राष्ट्रभक्तांसाठी खचितच नाहीत असेही आमदार राणे यांनी नमूद केले. इंडी आघाडी आणि मविआला मत दिले तर देशात भगवे झेंडे फडकावण्यास परवानगी मिळणार नाही, नाक्यानाक्यांवर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदू सणांवर बंदी घातली गेली होती. मात्र ईद, मोहरम ला परवानगी दिली गेली होती. तसेच चित्र इंडी आघाडीला मतदान केल्यास भारतात दिसेल, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा आमदार राणे यांनी समाचार घेतला. संजय राऊत यांनी अशी भाषा वापरणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांचा संयम सुटेल, असा इशाराही त्यांनी (Nitesh Rane) दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.