मतदानाचा टक्का वाढला; PM Narendra Modi यांनी मानले आभार; म्हणाले…

237
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले, त्यामध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचे आढळून आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक्सवर एक खास पोस्ट करत मतदारांचे आभार मानले. तसेच विरोधकांना खोचक टोला लगावला. दुसऱ्या टप्प्यातील मतदान चांगले झाले. दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या संपूर्ण देशभरातील लोकांचे आभार. एनडीएला मिळत असलेला अतुलनीय पाठिंबा विरोधकांची निराशा आणखी वाढवणारा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशात कुठे किती झाले मतदान? 

मतदारांना एनडीएचे सुशासन हवे आहे. युवा आणि महिला मतदार एनडीएच्या भक्कम पाठिंब्याला ताकद देत आहेत, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक्सवर केली आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता देशभरात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये ७०.६६ टक्के, बिहारमध्ये ५३.०३ टक्के, छत्तीसगडमध्ये ७२.१३ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ६७.२२ टक्के, कर्नाटकात ६३.९० टक्के, केरळमध्ये ६३.९७ टक्के, मध्य प्रदेशात ५४.८३ टक्के, महाराष्ट्रात ५३.५१ टक्के, मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के, राजस्थानमध्ये ५९.१९ टक्के, त्रिपुरात ७७.५३ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५२.७४ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ७१.८४ टक्के मतदार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.