Maharashtra Assembly Election मध्ये ४ कोटी ६६ लाख महिला मतदारांची मते ठरणार निर्णायक

121

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) बिगुल वाजले आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. यंदाच्या निवडणुकीत २० लाख ९३ हजार नवीन मतदार असणार आहे. तर महिला मतदार ४ कोटी ६६ लाख आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची यशस्वीता या निवडणुकीत परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.

असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचे वेळापत्रक

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

(हेही वाचा Election Commission : निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम’बाबत मोठा खुलासा)

288 जागांसाठी किती मतदार असतील?

  • एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
  • नव मतदार – 20.93 लाख
  • पुरूष मतदार – 4.97 कोटी
  • महिला मतदार – 4.66 कोटी
  • युवा मतदार – 1.85 कोटी
  • तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
  • 85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार – 6.32 लाख

महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?

  • एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
  • शहरी मतदार केंद्र – 42,604
  • ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
  • महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
  • एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.