राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. राजकारणी मंडळी प्रचारसभेत व्यस्त असून, मोठ-मोठे दावे प्रतिदावे करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई उपनगरातील चेंबूर (Chembur Voting boycott) भागातील काही नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या (Chembur Slum Rehabilitation Project) निमित्ताने विकासकाने १६ वर्षांपूर्वी मारवाडी चाळीतील २२५ घरांचे पाडकाम केले. मात्र, अद्याप प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. सरकारी दरबारी खेटा घालून ही त्यांच्या पदरात निराशाच आहे, या विरोधात दीड हजार रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. (Voting boycott)
हे आहे कारण…
चेंबूरमधील ‘बसंत पार्क’ या उच्चभ्रू कॉलनीलगत मारवाडी चाळ होती. या चाळीत २२५ घरे होती. एका विकासकाने १६ वर्षांपूर्वी इमारतीतील घराचे स्वप्न दाखवून ‘झोपु’ योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला. तीन वर्षांत इमारतीत घर मिळणार असल्याने रहिवाशींनी या योजनेला होकार दर्शवला. त्यानंतर झोपड्या रिकाम्या केल्या. सुरुवातीचे काही महिने विकासकाने या झोपडीधारकांना वेळेवर घरभाडे दिले. मात्र, कालांतराने विकासकाने झोपडीधारकांना घरभाडे देणे बंद केले होते.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा)
अद्याप ‘झोपु’ योजनेत नवी इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे झोपडीधारकांनी मदतीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती. या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती त्यांना अनेकदा करूनही तोडगा निघू शकलेला नाही.
हेही पाहा –