राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

124

१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबईत आणण्यात आले.

(हेही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, ठाणे स्थानकात तांत्रिक बिघाड)

या सर्व साहित्यांची वाहतूक करताना ‘बॅलेट बॉक्स’ ही व्यक्ती आहे, असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले.

साहित्य मुंबई विमानतळावरून महाराष्ट्र विधानभवनात

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळावरून महाराष्ट्र विधानभवनात आणण्यात आले. अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत हे साहित्य विधिमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूममध्ये पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.