राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
( हेही वाचा : मुंबईत सहप्रवाशांना सीटबेल्ट सक्ती नको! मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा आंदोलनाचा इशारा )
शमदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबरला होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबरला होईल, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती?
– अहमदनगर- 203
– अकोला- 266
– अमरावती- 257
– औरंगाबाद- 219
– बीड- 704
– भंडारा- 363
– बुलडाणा- 279
– चंद्रपूर- 59
– धुळे- 128
– गडचिरोली- 27
– गोंदिया- 348
– हिंगोली- 62
– जळगाव- 140
– जालना- 266
– कोल्हापूर- 475
– लातूर- 351
– नागपूर- 237
– नंदुरबार- 123
– उस्मानाबाद- 166
– पालघर- 63
– परभणी- 128
– पुणे- 221
– रायगड- 240
– रत्नागिरी- 222
– सांगली- 452
– सातारा- 319
– सिंधुदुर्ग- 325
– सोलापूर- 189
– ठाणे- 42
– वर्धा- 113
– वाशीम- 287
– यवतमाळ- 100
– नांदेड- 181
– नाशिक- 196
Join Our WhatsApp Community