भारताच्या सर्वोच्च पदासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षादेश धूडकावून विरोधक द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील; आशिष शेलारांचे सूचक वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे. त्यामुळे काॅंग्रेस- राष्ट्रवादीची मते फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपचे आमदार ट्रायडंट हाॅटेलमधून विधानभवनात दाखल झाले आहेत.
( हेही वाचा: पुस्तकांचीही झाली होती फाळणी; त्यावेळचा ‘हा’ जगप्रसिद्ध फोटो पाहिलात का? )
आशिष शेलार यांचे सूचक वक्तव्य
सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना, भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले की, आम्हाला महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसत नाही. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येने मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरणार आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत काय झाले ते राज्याने पाहिले आहे. पक्षादेश धुडकावून सोमवारी द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान होईल, असे सूचक वक्तव्य शेलार यांनी केले.
Join Our WhatsApp Community