चंद्रपूरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Andhari Tiger Reserve) सोडलेल्या गिधाडाने थेट तामिळनाडूपर्यत उड्डाण केले आहे. पाच राज्यांमधून किमान ४ हजार किलोमीटरचा प्रवास करुन ‘एन ११’ (N11 vulture) असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड तामिळनाडूतील कलसपाक्कम तालुक्यात पोहोचला आहे. हा गिधाड तामिळनाडू पर्यंत हवाई प्रवास करून पोहोचला अशी माहिती बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (BNHS) लावलेल्या ‘जीपीएस टॅग’ मधून मिळाली आहे. (Vulture Migration)
(हेही वाचा – मराठा आरक्षण मजा घेण्याचा प्रश्न नाही; Devendra Fadnavis यांचा जरांगेंना टोला)
राज्यासह देशात गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, ‘बीएनएचएस’ गेल्या कित्येक वर्षांपासून यावर काम करत आहे. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे ‘बीएनएचएस’ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पठ्ठ्याची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली. त्यांना याठिकाणी उभारण्यात आलेल्या जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पठ्ठ्याच्या गिधाडांंना ‘जीपीएस टॅग’ (N11 vulture GPS Tag) लावून ३ आॅगस्ट रोजी ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील ‘एन-११’ या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू (N11 vulture Tamil Nadu migration) असा प्रवास केला आहे.
(हेही वाचा – सत्तेतील भाजपाचा भक्कम पाया अटलजींनी घातला; Raj Thackeray यांचे पोस्टद्वारे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन)
ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० किमी अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले. अशक्त वाटल्याने त्याठिकाणी त्याला पकडून त्याच्यावर उपचार करुन २६ सप्टेंबर रोजी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत १९ ऑक्टोबर रोजी या गिधाडाने गुजरात गाठले. यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.२५ वाजता गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले सापडले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करुन पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community