Assembly Election 2024 : तब्बल १८ वर्षांनंतर श्रद्धा जाधव यांचे स्वप्न साकार, कोळंबकर यांना भिडणार

119
Assembly Election 2024 : तब्बल १८ वर्षांनंतर श्रद्धा जाधव यांचे स्वप्न साकार, कोळंबकर यांना भिडणार
  • सचिन धानजी, मुंबई

वडाळा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मागील २००९ पासून इच्छुक असणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना अखेर आगामी विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. वडाळा विधानसभेतून त्यांना उमेदवारी जाहीर करत त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनी श्रद्धा जाधव यांचे स्वप्न साकार झाले असून मागील २००४ पासून सलग आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भाजपाचे कालिदास कोळंबकर यांच्याशी त्यांची प्रमुख लढत आहे. (Assembly Election 2024)

दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभेत सन १९९० मध्ये नायगाव विधानसभेत शिवसेनेच्या तिकीटावर प्रथम कालिदास कोळंबकर हे निवडून आले होते. त्यानंतर सन २००४ पर्यंत ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहे. परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांच्यासोबत कालिदास कोळंबकर हे काँग्रेस पक्षात गेल्याने याठिकाणी झालेल्या सन २००९ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून तत्कालिन नगरसेविका असलेल्या श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत श्रद्धा जाधव यांचा पराभव करून कोळंबकर हे निवडून आले. या पोटनिवडणुकीमधील विजयानंतर सन २००९मध्ये नायगाव विधानसभेऐवजी हा मतदारसंघ वडाळा विधानसभा म्हणून ओळखला जाऊ लागला. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Election Affidavit : आदित्य ठाकरे यांची संपत्ती पाच वर्षात ३५ टक्क्यांनी वाढली!)

सन २००० मध्ये तत्कालिन काँग्रेसचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ दावेदार श्रद्धा जाधव या असताना शिवसेनेने दिगंबर कांडरकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि या निवडणुकीत कोळंबकर यांनी कांडरकर यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत कोळंबकर यांच्या विरोधात शिवसेनेने हेमंत डोके यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. तर भाजपाचे उमेदवार असलेले मिहिर कोटेचा यांचा केवळ ८०० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला आणि शिवसेना व भाजपाची युती झाल्याने श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता माळवली गेली. युतीमध्ये ही जागा भाजपाला गेल्याने कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि कोळंबकर हे तब्बल ३० हजार मतांनी निवडून आले. (Assembly Election 2024)

परंतु आता सन २०२४ च्या आगामी निवडणुकीत उबाठा शिवसेना महाविकास आघाडीत तर शिवसेना महायुतीत असल्याने युतीतून कोळंबकर यांची उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीतून ही जागा उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने याठिकाणांहून श्रद्धा जाधव यांची दावेदारी पक्की मानली जात होती. परंतु, आयत्या वेळी आयात उमेदवारामुळे उमेदवारी दिली जाते की नाही याबाबत जाधव यांची धाकधुक वाढलेली असतानाच यादीत नाव जाहीर होण्यापूर्वीच मातोश्रीवर श्रद्धा जाधव यांना ए, बी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आला. त्यामुळे सन २००७ च्या पोटनिवडणुकी कोळंबकर यांना भिडणाऱ्या श्रद्धा जाधव या आता तब्बल १८ वर्षांनंतर म्हणजे २०२४ मध्ये दोन हात करणार आहे. परंतु सन २००७ च्या तुलनेत श्रद्धा जाधव यांची ताकद विभागात वाढलेली आहे. त्यातच शिवसेनेचे अमेय घोले आणि काँग्रेसचे सुनील मोरे हे शिवसेनेत गेल्याने कोळंबकर यांचीही ताकद वाढलेली असताना श्रद्धा जाधव यांचा कोळंबकर यांच्यासमोर कशाप्रकारे निभाव लागतो किंवा त्या कोळंबकर यांची मिहिर कोटेचा यांच्याप्रमाणे नाकात दम आणतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.