भाजपा, भारत राष्ट्रनिर्माण पक्ष असा राजकीय प्रवास करून माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांची आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
वाघमारे यांचा राजकीय प्रवास
चरण वाघमारे (Charan Waghmare) भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि २०१४ मध्ये भाजपाचे आमदार होते. मात्र, भाजपा नेत्यांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी बंडखोरी करत भारत राष्ट्रनिर्माण पक्षात प्रवेश केला. तेलंगणात पक्षाच्या अपयशानंतर महाराष्ट्रातील विस्तार थांबला आणि वाघमारे अनिश्चिततेत होते.
(हेही वाचा – Raj Thackeray यांनी आत्मचिंतन करावे; राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला)
शरद पवारांचा डाव आणि स्थानिकांचा विरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमदार राजू कारेमोरे, प्रफुल्ल पटेल (Praful Patel) गटात गेले. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांनी भंडाऱ्यात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी चरण वाघमारे (Charan Waghmare) यांना उमेदवारी दिली. स्थानिक नेत्यांनी वाघमारे यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला आणि स्वतःचा स्वतंत्र मेळावा घेत निषेध नोंदवला.
जयंत पाटलांचा निर्णय आणि पुढील राजकीय समीकरणे
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे विजयी झाले, पण पक्षाची भंडाऱ्यातील ताकद कमी झाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाघमारे यांना जिल्हाध्यक्ष पद देत जबाबदारी सोपवली. मात्र, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community