भरत गोगावले म्हणतात, आगे आगे देखो होता है क्या…

137
आज आम्ही जरी पालापाचोळा वाटत असलो, तरी याच पालापाचोळ्याने करामत करून दाखवली आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे. आगे आगे देखो होता है क्या, अशी टिप्पणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केली. मुलाखत घेणारे हे सुपारी घेऊन आले आहेत. त्यांनी आता सेकंड इनिंग सुरू केली आहे, हे या मुलाखतीद्वारे सिद्ध झाल्याचेही गोगावले म्हणाले.
गोगावले यांनीही माजी मुख्यमंत्री यांच्या पालापाचोळा या टिप्पणीला आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. पालापाचोळा काय करू शकतो याचे उदाहरण आपण पाहिले आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुणी किती बोलावे? काय बोलावं? याबाबत आम्हाला काही संकेत आहेत. आम्ही आमचे काम केले आहे, आगे देखो होता है क्या!, असेही ते म्हणाले.

निवडणुकांमध्ये दाखवणार चुणूक 

तीन ते चार महिन्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही आपल्याला करामत दिसेल. अडीच वर्षानंतर विधानसभा निवडणूक असून त्याआधी लोकसभेची निवडणूक आहे.  त्याच्यामध्ये आम्ही करिष्मा करून दाखवणार आहोत. ते मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे, असेही गोगावले म्हणाले.

बाळासाहेब कोणाची खासगी मालमत्ता नाही 

बाळासाहेबांना आम्ही दैवत मानले आहे. याचा अर्थ ‘वडील जरी त्यांचे असले तरी त्यांना उंचीवर नेण्याचं काम  हे सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांनी केलेलं आहे, हे कुणाला नाकारता येणार नाही म्हणून बाळासाहेब कुणाची प्रायव्हेट मालमत्ता नाही. ती आम्हा सर्व शिवसैनिकांची मालमत्ता आहे. त्याचा वापर करून आम्ही पुढे चाललो आहोत. आम्ही उद्धव साहेबांची मालमत्ता वापरत नाही. बाळासाहेबांनी सर्वांसाठी केलेला जो त्याग आहे त्यात त्यागाचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही अजून पर्यंत वाट पाहत होतो की काहीतरी दोन पाऊले पाठी पुढे सरकण्याचे काम होईल. परंतु हे आता दिसत नाही, याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.