सेना-राष्ट्रवादीचा सभात्याग नव्हे सत्ताधाऱयांसाठी केलेला त्याग – अशोक चव्हाण  

106

अशोक शुक्ला

मुंबई – कृषी विधेयकाला संसदेत सर्व विरोधी पक्ष एकजात विरोध करत आहेत. लोकसभेत बहुमताच्या जोरावर विधेयके संमत केल्यावर ती राज्यसभेत बहुमताच्या अभावाने अडकले जाईल, अशी भीती सत्तारूढ भाजपाला होती. त्यावर भाजपने रणनीती आखली, ज्यानुसार जेव्हा हि विधेयके राज्यसभेत चर्चेला आली तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सभात्याग केला. परिणामी दोन तृतीयांश बहुमताने हि विधेयके दोन्ही सभागृहात पारित झाली. 

राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. सभागृहात विधेयके मांडताच जाणीवपुर्वक या दोन्ही मित्र पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे राज्यसभेत सदस्य संख्या घटली. ज्यामुळे भाजप हि विधेयके मंजूर करू शकली. वास्तवीक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादीसोबत काँग्रेस सत्तेत आहे. असा परिस्थितीत राज्यसभेत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला एकटे पाडले.

तेव्हा राष्ट्रवादीचे खासदार चहापानात होते मग्न 

जेव्हा राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उपाहारगृहात चहापान घेत होते, तेव्हा ती संधी साधून भाजपने तात्काळ कृषी विधेयके मंजूर करून घेतली. हे अत्यंत चुकीचे आहे, आमचा या विधेयकांना विरोध आहे, असे शरद पवार म्हणाले .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.