कोरोना ‘मेड इन चायना’! जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल! 

कोविड -१९ या महामारीचे मूळ शोधण्यासाठी पुढच्या टप्प्याची चौकशी सुरु करण्याचा विचार जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केला आहे. तर जो बायडन प्रशासनानेही याची चौकशी करण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.

जगभरातील सुमारे  ३ कोटी जनतेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतच करण्यात आली, असा आरोप जगभरातून होत आला आहे. मात्र चीनने कायम त्याला नकार दिला आहे. मात्र आता अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात चीनने पहिल्यांदा या विषाणूबाबत जगाला माहिती देण्याआधी वुहानच्या त्या प्रयोगशाळेतील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती दिली आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून देण्यात आली आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग चीनमधूनच झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

कोरोनाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न सुरूच राहणार! 

वुहानच्या प्रयोगशाळेतील ते कर्मचारी नोव्हेंबर २०१९ रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत या विषयाचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे कोविड -१९ या महामारीचे मूळ शोधण्यासाठी पुढच्या टप्प्याची चौकशी सुरु करण्याचा विचार जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केला आहे. तर जो बायडन प्रशासनानेही याची चौकशी करण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेसोबत काम करत आहे. तसेच या महामारीचे मूळ शोधण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाशिवाय याची चौकशी झाली पाहिजे, असेही अमेरिकेचे म्हणणे आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. यावर वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासानेही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.

(हेही वाचा : महापालिका कोरोनाबाबत खरोखरच गंभीर आहे का?)

विषाणूची निर्मिती नैसर्गिक नाहीच!

जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेचे चौकशी पथक चीनमध्ये गेले होते, तेव्हा चीनने त्यांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिला होता. हा विषाणू नैसर्गिकरित्या उत्पन्न झाला नाही, याची उघडपणे चौकशी झाली पाहिजे, असे अमेरिकेतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन केलेल्या समितीतील सदस्य डॉ. ऍंथोनी फौसी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here