केंद्रातील एनडीए सरकारने गुरुवारी (८ ऑगस्ट) लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ सादर केले. जिथे विरोधक या विधेयकाला मुस्लिम विरोधी म्हणत आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे नेते या विधेयकाला आवश्यक असल्याचे सांगत पाठिंबा देत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी समर्थनार्थ हे विधेयक का आणण्याची गरज होती, याबाबत स्पष्ट भूमिका केली. (Waqf Amendment Bill)
लोकसभेत श्रीकांत शिंदे यांनी केले वक्फ विधेयकाचे समर्थन, काय म्हणाले?
.#shrikantshinde #loksabha #WaqfBoard #govenment #BJP #NDA #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi pic.twitter.com/rCiywRdarg— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 8, 2024
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, वक्फ जमिनीबाबत देशभरात ८५ हजार खटले सुरू असल्याने हे विधेयक आणण्याची गरज होती. ते म्हणाले की, उच्च न्यायालय (High Court) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) असे १६५ हून अधिक खटले सुरू आहेत. तसेच सभागृहात श्रीकांत शिंदे म्हणाले की, विरोधकांना वक्फ जमिनीवर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये नको आहेत, तर ते व्होट बँक आणि समाजाला खूश करण्यासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. तसेच पुढे म्हणाले की, मी या विधेयकाचे स्वागत करतो. जे विरोध करत आहेत त्यांनाही मी या विधेयकाला पाठिंबा देण्यास सांगेन. असे विधान खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केले.
(हेही वाचा – Surajya Abhiyan कडून राज्यपालांकडे चौकशीची मागणी; बोगस प्रशासकीय अधिकार्यांची नियुक्ती झाल्याची शक्यता)
तर काँग्रेसने हे विधेयक संविधानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार अयोध्येत मंदिर मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले. गैर-हिंदू त्याचा सदस्य होऊ शकतो का? मग वक्फ परिषदेत (Waqf Council) बिगर मुस्लिम सदस्याची चर्चा का? केसी वेणुगोपाल यांनी दावा केला की हे विधेयक आस्था आणि धर्माच्या अधिकारावर हल्ला आहे. आता तुम्ही मुस्लिमांवर हल्ले कराल, मग ख्रिश्चनांवर हल्ले कराल, मग जैनांवर हल्ले कराल. असे ते म्हणाले. (Waqf Amendment Bill)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community