Waqf Amendment Bill :…तर संसद भवन देखील वक्फने काबीज केले असते; मंत्री किरण रिजिजू काय म्हणाले?

बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले.

132
लोकसभेत वक्फ विधेयक (Waqf Amendment Bill) मांडण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. लोकसभेत वक्फ विधेयकावर चर्चा करताना त्यांनी स्पष्ट केले की वक्फ विधेयकात धार्मिक कार्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीही तरतूद नाही. जर दुरुस्ती आणली नसती तर ही संसद इमारत देखील वक्फ मालमत्ता असती असा दावाही त्यांनी केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना किरेन रिजिजू म्हणाले की, आज या वक्फ दुरुस्ती विधेयकाला (Waqf Amendment Bill) विरोध करणाऱ्यांना शतकानुशतके लक्षात ठेवले जाईल. आजपर्यंत कोणत्याही विधेयकावर इतक्या याचिका आलेल्या नाहीत.

संसदेत किरण रिजिजू काय म्हणाले? 

वक्फ विधेयकावरील (Waqf Amendment Bill) चर्चेला सुरुवात करताना, किरेन रिजिजू म्हणाले, ‘ऑनलाइन, निवेदने, विनंत्या आणि सूचनांच्या स्वरूपात एकूण ९७,२७,७७२ याचिका प्राप्त झाल्या आहेत. समितीसमोर २८४ शिष्टमंडळांनी आपले विचार मांडले आणि सूचना दिल्या. सरकारने या सर्वांचा काळजीपूर्वक विचार केला आहे, मग तो जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) द्वारे असो किंवा थेट दिलेल्या निवेदनाद्वारे असो. इतिहासात कधीही इतक्या मोठ्या संख्येने कोणत्याही विधेयकाला याचिका आल्या नव्हत्या. अनेक कायदेतज्ज्ञ, समुदाय नेते, धार्मिक नेते आणि इतरांनी समितीसमोर आपले सूचना सादर केल्या.
ते पुढे म्हणाले, ‘गेल्या वेळी जेव्हा आम्ही विधेयक सादर केले तेव्हा आम्ही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मला केवळ आशाच नाही तर विश्वास आहे की जे लोक याला विरोध करत होते त्यांचे मन बदलेल आणि ते विधेयकाला (Waqf Amendment Bill) पाठिंबा देतील. माझ्या मनात जे आहे ते मला सांगायचे आहे, कोणीही कोणाचेही शब्द वाईट समजू नयेत, आकाश कधीही पृथ्वीचे दुःख समजू शकत नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.