दाऊदी बोहरा मुसलमानांकडून Waqf Ammendment Law चे स्वागत; पंतप्रधान मोदींना भेटून मानले आभार

1212

Waqf Ammendment Law : वक्फ सुधारणा कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची गुरुवार १७ एप्रिलला भेट घेतली. तसेच बैठकीदरम्यान, समुदायाच्या सदस्यांनी सांगितले की ही एक दीर्घकाळापासून प्रलंबित मागणी होती. जी आता पूर्ण झाली आहे. अशी माहिती एका इंग्रजी वृत्तसमूहाने एक्सच्या माध्यामातून दिली आहे. (Waqf Ammendment Law)

दिल्ली येथे झालेल्या या भेटी दरम्यान, दाऊदी बोहरा समुदायाच्या (Dawoodi Bohra community meets PM Modi) सदस्यांनी पंतप्रधानांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या दृष्टिकोनावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच या बैठकीचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी दाऊदी बोहरा सदस्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

(हेही वाचा – हिंदी भाषेच्या सक्तीवर CM Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)

दाऊदी बोहरा समुदाय हा इस्लामच्या शिया इस्माईली वर्गातील एक पंथ आहे आणि भारतात आणि जगभरात त्याचे महत्त्वपूर्ण असे अस्तित्व आहे. तसेच वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५, ४ एप्रिल रोजी संसदेने (Parliament) मंजूर करण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्षांच्या तीव्र टीकेला न जुमानता, लोकसभेत १२ तासांच्या विस्तृत चर्चेनंतर आणि त्यानंतर राज्यसभेत १४ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.