Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ !

Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार 'वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान' !

59
Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार 'वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान' !
Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार 'वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान' !

भाजपा २० एप्रिल ते ५ मे पर्यंत ‘वक्फ दुरुस्ती जागरूकता अभियान’ देशभरात राबवणार आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यातील (Waqf Amentment Act) सुधारणांच्या फायद्यांची माहिती मुस्लीम समाजाला देणे, वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून जे बोलले जात आहे त्याविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाची तयारीसाठी राजधानी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात एका कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संबोधित केले. (Waqf Amentment Act)

हेही वाचा-२६/११ चा खटला मुंबईत चालवला तर Tahawwur Rana ला कसाब चा बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवणार ?

‘वक्फ दुरुस्ती कायद्यामुळे वंचित मुस्लिमांचा फायदा होईल. विशेषतः शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात वक्फ मालमत्तेचा अधिक चांगला वापर होईल’, असे जे. पी. नड्डा कार्यशाळेत म्हणाले. वक्फ विधेयकाबाबत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. मुस्लिम समुदायाची दिशाभूल केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. (Waqf Amentment Act)

हेही वाचा- मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड Tahawwur Rana ला फाशी होणार ? प्रत्यार्पणासंबंधी अटींमध्ये नेमकं काय ?

भाजपा कार्यकर्ते मुस्लिम बंधू-भगिनींपर्यंत सक्रियपणे पोहोचतील जेणेकरून विरोधी पक्षांचा खोटेपणा उघड होईल आणि कायद्याचा खरा हेतू आणि फायदे स्पष्ट होतील, असे नड्डा म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी कार्यशाळेत वक्फ सुधारणांबद्दल सविस्तर माहिती दिली. (Waqf Amentment Act)

हेही वाचा- मुंबई शहराकरिता ‘वहन क्षमता सर्वेक्षण’ करण्याची मागणी करणारी याचिका High Court मध्ये दाखल !

भाजपाने प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षांसह तीन ते चार नेत्यांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. जिल्हास्तरीय भाजपा नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्यात अशाच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश या नेत्यांना देण्यात आले आहेत. या अभियानाद्वारे, भाजपाचा हेतू वक्फ सुधारणांबद्दलचे सत्य तळागाळातील पातळीपर्यंत पोहोचवणे आहे. (Waqf Amentment Act)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.