Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर उबाठाकडून मुस्लिमांचे लांगूलचालन!

345
Waqf Board Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर उबाठाकडून मुस्लिमांचे लांगूलचालन!

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि लोकसभेत ८ ऑगस्टला मांडलेल्या वक्फ बोर्डाच्या (Waqf Board Bill) कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकावर शिवसेना (उबाठा) गटाने गेले आठवडाभर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर बुधवार १४ ऑगस्ट २०२४ रोजी उबाठाने ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या’ दैनिक ‘सामना’तून नाही, तर ‘लोकसत्ता’तून वक्फ बोर्डाच्या सुधारणेला अप्रत्यक्ष विरोध करत मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी आपली भूमिका मांडली.

भाजपावर आरोप

‘भाजपाला मुस्लिमांनी मतदान केले नाही या गैरसमजातून त्यांनी आता त्यांच्या (मुस्लिमांच्या) भावनांचा अनादर करण्यास सुरुवात केली आहे,’ असे मत उबाठा प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी ‘लोकसत्ता’मध्ये छापून आलेला लेखात व्यक्त केले असून भाजपा व्यक्फच्या नावाने राजकारण करीत आहे, असा आरोप केला आहे. (Waqf Board Bill)

(हेही वाचा – Congress : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला)

गैर-मुस्लिमांना अधिकार दिल्याबद्दल नाराजीचा सूर

प्रस्तावित कायद्यात ४० सुधारणांसाह अनेक कलमे रद्द करण्याचे प्रस्तावित आहे. मुस्लिम यांच्यासह गैर-मुस्लिम यांना प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचे सुधारित कायद्यात म्हटले आहे. व्यक्फ बोर्डच्या ज्या जमीन, मालमत्ता यांचा वाद आहे, अशा वेळी ती जमीन वक्फची आहे की सरकारची याचा अभ्यास करून निर्णय अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, असे मुद्दे मांडत गैर-मुस्लिम अधिकाऱ्यांना अधिकार दिल्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (Waqf Board Bill)

ठाकरेच लक्ष्य

“थोडक्यात या साऱ्याच्या केंद्रस्थानी जमीन आहे. मोदी-शाह जमिनींवर कोणासाठी नजर ठेवतात हे जम्मू काश्मीरपासून धारावीपर्यंत सर्वच प्रकरणांतून स्पष्ट झाले आहे. यात सर्व पक्ष प्रमुख काय म्हणतात ते सोडून केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच यावरून लक्ष्य करणे कितपत योग्य आहे?” असा सवाल प्रधान यांनी या लेखातून विचारला आहे. (Waqf Board Bill)

(हेही वाचा – Independence Day: तुम्हाला माहित आहे का, पहिली परेड कधी घेण्यात आली होती?)

लोकसभेतून पळ; मुस्लिमांची नाराजी

वक्फ बोर्ड विधेयक (Waqf Board Bill) मांडले तेव्हा उबाठाच्या खासदारांनी लोकसभेतून पळ काढल्याबद्दल जाब विचारण्यासाठी काही मुस्लिम सांगटनांनी ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर निदर्शने केली. वास्तविक, विधेयक मांडले तेव्हा ठाकरे यांच्या खासदारांनी संसदेतून पळ काढला आणि कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. लोकसभेला मुस्लिमांची मते मागायला उद्धव ठाकरे पुढे आले मात्र मुस्लिमांच्या हकांसाठी आवाज उठवण्याची गरज होती तेव्हा उबाठाचे ९ खासदार लोकसभेतून गायब झाले, असा आरोप एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यांचे उत्तर देऊ, असा इशारा पठाण यांनी ठाकरे यांना दिला आहे.

काँग्रेसशी युती केली असली तरी आम्ही आमचे हिंदुत्व सोडले नाही, याची प्रत्येक सभेत आठवण करून देणाऱ्या ठाकरे यांनी व्यक्फ बोर्ड विषयावर उघड आणि स्पष्ट भूमिका अद्याप घेतली नसून उबाठाला विधानसभेला या प्रश्नावर अडचणींना सामोरे जावे लागणार, यात शंका नाही. (Waqf Board Bill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.