लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय…

225
लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय...
लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय...

लातूर (Latur) जिल्ह्यातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला आहे. त्यामुळे लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने (Waqf Board) नोटीस पाठवली आहे. ज्यामुळे या जमिनीच्या वादात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेले आहे. या प्रकरणामुळे तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.(Waqf Board)

( हेही वाचा : “…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल

दरम्यान याप्रकरणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, हे सामान्य लोकांचे सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. तर दुसरीकडे शेतकरी तुकाराम कानवटे म्हणाले की, आम्ही या शेतजमिनीवर पिढ्यानपिढ्या शेती करत आहोत. ही वक्फ बोर्डाची (Waqf Board) मालमत्ता नाही. महाराष्ट्र शासनाने यात हस्तक्षेप करावा. या प्रकरणात आतापर्यंत २ वेळा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. (Waqf Board)

वक्फ म्हणजे काय?

अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असे म्हटले जाते. ही संपत्ती स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही स्वरूपात असू शकते. दरम्यान एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते. या मालमत्तेचा वापर सामान्यत: शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो. (Waqf Board)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.