​​​​​​​ठाकरे गटाची Waqf Board बाबत भूमिका अनाकलनीय, असं कोण म्हणतयं?

183
​​​​​​​ठाकरे गटाची Waqf Board बाबत भूमिका अनाकलनीय, असं कोण म्हणतयं?
​​​​​​​ठाकरे गटाची Waqf Board बाबत भूमिका अनाकलनीय, असं कोण म्हणतयं?

वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मुद्द्यावर उबाठाची (UBT) भूमिका अनाकलनीय आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेला तिलांजली दिली, असे म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाच्या भुमिकेवर हल्लाबोल केला आहे.

… तर मनसे उबाठाला विरोध करेल
प्रकाश महाजन म्हणाले की, “केवळ मतांसाठी कोणी वक्फ बोर्डाची तरफदारी करत असेल, तर ते अयोग्य असून मनसे उबाठाला विरोध करेल. आपण ही लव्ह जिहाद आणि जातीय दंगलींचा प्रतिकार केला पाहिजे. बांगलादेशच्या हिंदूंनी अडचणीच्या प्रसंगी संघटित होऊन प्रतिकार करत आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.” असं ते म्हणाले. (Waqf Board)

अनेकांचा राजकीय आरक्षणावर डोळा
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, “मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. फक्त शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाच्या आडून अनेकांचा राजकीय आरक्षणावर डोळा आहे. या संपूर्ण संघर्षात राजकीय आरक्षण हाच खरा कळीचा मुद्दा आहे. शैक्षणिक आणि नोकऱ्यामधील आरक्षण आर्थिक निकषावर आधारित राहिले असते तर कोणाची अडचणच नव्हती.” (Waqf Board)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.