JPC report on Waqf : वक्फ विधेयकावरील अहवाल सादर करतांना विरोधकांचा गोंधळ; सभापतींनी सुनावले खडे बोल

66
JPC report on Waqf : वक्फ विधेयकावरील अहवाल सादर करतांना विरोधकांचा गोंधळ; सभापतींनी सुनावले खडे बोल
JPC report on Waqf : वक्फ विधेयकावरील अहवाल सादर करतांना विरोधकांचा गोंधळ; सभापतींनी सुनावले खडे बोल

वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणले जात आहे. त्याला विरोध झाल्यानंतर त्यातील सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करण्यात आली. (JPC report on Waqf) या समितीने तिचा अहवाल तयार केला आहे. तो सादर करतांना लोकसभा आणि राज्यसभा येथे विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

(हेही वाचा – AI तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती ; मंत्री Nitesh Rane यांचे वक्तव्य)

लोकसभेत गोंधळ

१३ फेब्रुवारी या दिवशी सुधारणा विधेयकावरून संसदीय समितीचा अहवाल सादर करतांना लोकसभेत (Lok Sabha) विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले, तर त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब झाल्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केले.

राज्यसभेचे कामकाज स्थगित

राज्यसभेत (Rajya Sabha) जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा अहवाल सादर झाला, तेव्हाही विरोधकांना गदारोळ केला. राज्यसभेत या संदर्भातला अहवाल भाजपा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मांडला. सभापती जगदीप धनकड यांनी विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभेचेही कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले.

ओम बिर्ला यांनी काय म्हटले आहे ?

प्रश्नोत्तराच्या काळात कुठलाही गदारोळ घालायचा नसतो. नव्याने निवडून आलेले खासदार प्रश्न उपस्थित करत असतात. त्यांच्यासमोर तुम्ही विरोधक म्हणून गदारोळाचा आदर्श घालून देत आहात का? तुम्ही योग्य प्रकारे विरोध दर्शवा, मी तुमच्या पाठीशी उभा राहिन. पण आत्ता जे करत आहात त्यावरून हेच दिसत आहे की, तुम्हाला सदनाचे कामकाज योग्य पद्धतीने चालू द्यायचे नाही. त्यामुळे मी सदनाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करतो आहे, असे म्हणत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.