मविआ ने निवडणूक हरल्यानंतर नेहमीप्रमाणे रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक (EVM Machine Hack) होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि कळवा-मुंब्रा मतदार संघात बॅलेट पेपरवर (Ballot paper) निवडणूक घेण्यासाठी ओपन चॅलेंज आनंद परांजपे यांनी दिले होते. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, दोन्ही नेत्यांनी बापाचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली आहे. (Anand Paranjape)
राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी शरद पवार यांची साथ दिली. तर, त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली. तेव्हापासून आव्हाड विरुद्ध परांजपे आणि मुल्ला असा सामना रंगला आहे. आव्हाड यांच्याविरोधात मुल्ला यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकी आधीपासून जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यातील आरोपप्रत्यारोपाची लढाई सुरू असून ती निवडणूकीनंतरही थांबलेली नसल्याचे चित्र दिसत आहे.
(हेही वाचा – Gleneagles Hospital Mumbai : मुंबईतील ग्लेनीगल्स हॉस्पिटल कोणाच्या मालकीचं आहे?) दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आनंद परांजपे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. “मी दहा वेळा पक्ष बदलत ना ही, कारण माझा बाप एकच आहे” असे आव्हाड म्हणाले होते. त्यास आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर देत आव्हाड यांच्यावर आरोप केले होते.” माझे वडील एकच आहेत. त्यांचे नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे. मी मरेपर्यंत माझ्या वडिलांचे नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे हेच राहील. पण आपण मात्र ज्यांना विठ्ठल आणि बाप म्हणतात त्यांना किती वेळा खोटे बोलले आहे. या अनेक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. गणेश नाईक, वसंत डावखरे यांच्या बाबत कितीतरी वेळा खोटं फिडींग आपण शरद पवारांना दिले. किती लोक आपल्या खोट्या फिडींगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) ठाणे जिल्ह्यातून सोडून गेले ही लिस्ट खूप मोठी आहे, असे आनंद परांजपे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस (Jitendra Awad Short Term Memory Loss) झालेला आहे, या निष्कर्षात मी आलो आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.