Sunil Tatkare : २००९ मध्ये शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवणार होतो?; सुनिल तटकरेंचा गौप्यस्फोट!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते.

102
मतदारसंघातील वातावरण पूरक होईल असा प्रयत्न केला जाईल; Sunil Tatkare यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र काही कारणामुळे ते नंतर घडले नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मंगळवारी (०७ नोव्हेंबर) केला. (Sunil Tatkare)

२०१४ मध्येही भाजपला पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत मग आता आम्ही भाजपसोबत जाऊन काय चूक केली असा सवाल करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडलेल्या मंत्रीमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण टीका आजही करत आहेत काहीजणांना नैराश्य आल्याचा सणसणीत टोला खा. तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टिका आता करत आहेत. परंतु स्वतःच्या सावलीलाही घाबरणाऱ्या लोकांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे, असे सांगत खा. तटकरे यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे खा. सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. (Sunil Tatkare)

(हेही वाचा – Udhayanidhi Stalin : ‘मी सनातनला कायम विरोध करणार; माझी भूमिका बदलणार नाही; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतरही उदयनिधी स्टॅलिन ठाम)

राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबाच दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेने दाखवून दिल्याचा दावाही तटकरे यांनी केला. आता आपल्याला देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहनही खा. तटकरे यांनी केले. (Sunil Tatkare)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.