ड्रग्स पार्टीत पार्थ पवार? एनसीबी म्हणते ‘चौकशी सुरु आहे!’

ताब्यात घेतलेल्या १४ जणांपैकी आठ जणांना पुरव्याच्या आधारावर अटक करण्यात आले. तर सहा जाणांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आले, असेही एनसीबीने म्हटले.

85

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार ड्रग्स पार्टीत होते का? या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले की, जे नाव तुम्ही घेत आहात. सध्या तपास सुरु आहे आणि असे कुठलेही नाव घेणे योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार एजन्सी आहोत आणि कुठलेही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे त्यावर बोलतो, जे पुरावे आहेत त्यावर बोलतो, असे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे म्हणाले.

मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले. क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपाच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेश होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावे जाहीर करण्यास नकार देण्यात आला.

(हेही वाचा : क्रूझवरून सोडून दिलेला ‘तो’ मेव्हणा मोहित भारती यांचा!)

हे मोठे नेटवर्क! 

आम्ही आमच्या माहिती आणि लोकांच्या माहितीच्या आधारावर काम करतो. आम्हाला अशाच प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर कारवाई केली. आमच्या पद्धतीनुसार आम्हाला २ साक्षीदार नेमावे लागतात. यावेळी आम्हाला तात्काळ जायचे असते. येणा-यांचा पूर्व इतिहास तपासणे शक्य नसते. मनीष भानुशाली, गोसावी यांच्या बाबत एनसीबीला काही माहिती नव्हती. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना आणण्यात आले. आम्ही १४ जणांना एनसीबी कार्यलयात आणले होते. कायद्यानुसार त्यांचे जबाब घेण्यात आले. त्यानंतर १४ पैकी ८ जणांना अटक केली आणि ६ जणांना सोडले. ज्या ८ जणांना अटक किलो त्यांना प्रथम एक दिवस त्या नंतर ४ दिवस आणि त्यानंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. कोठडीत असताना आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी ६ ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे. हे एक मोठे नेटवर्क आहे. हे आपल्या तरुणांना बरबाद करत आहेत. आमची कारवाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली.

तीनच नव्हे सहा जणांना सोडले

त्या दिवशी एकूण १४ लोकांना एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले. सर्वांना कलम ६७ अंतर्गत नोटीस देण्यात आली. नंतर सर्वांची तपासणी केली गेली. तसेच स्टेटमेंट रेकॉर्ड़ केले गेले. ताब्यात घेतलेल्या १४ जणांपैकी आठ जणांना पुरव्याच्या आधारावर अटक करण्यात आले. तर सहा जाणांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आले, असेही एनसीबीने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.