कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का?; Ashish Shelar यांची चौकशीची मागणी

106
कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का?; Ashish Shelar यांची चौकशीची मागणी

रेस कोर्स आणि कोस्‍टल रोडमध्‍ये नव्‍याने निर्माण झालेल्‍या ३०० एकर जागेत कोणतेही व्यावसायिक बांधकाम न करता मुंबईकरांसाठी मोकळ्या जागेची निर्मिती आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मुंबईकरांतर्फे आभार मानतानाच मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी तत्‍कालीन पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या काळात कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का ? याची चौकशी करा, अशी मागणी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली आहे. (Ashish Shelar)

मुंबईतील महालक्ष्‍मी रेसर्कासवरील तब्‍बल १२० एकर जागेमध्‍ये सेंट्रल पार्क उभारण्‍यात येणार असून यामुळे मुंबईचे पर्यावरणात व सौंदर्यात भर पडणार आहे. त्‍या सोबतच कोस्‍टल रोडची निर्मिती करताना समुद्रातील भरावामुळे निर्माण झालेल्‍या १८० एकर जागेमध्‍ये सुध्‍दा वृक्ष लागवड व सुशोभिकरण करण्‍यात येणार आहे त्‍यामुळे मुंबईकरांना तब्‍बल ३०० एकर मोकळी जागा उपलब्‍ध होणार आहे. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Shivam Dube : जखमी नितीश रेड्डी ऐवजी शिवम दुबे झिम्बाब्वेला जाणार!)

दरम्‍यान, कोस्‍टल रोड तयार करताना समुद्रात टाकण्‍यात आलेल्‍या भरावातून १८० एकर जागा नव्‍याने निर्माण झाली आहे. या कोस्‍टल रोडला परवानगी देतानाच केंद्रीय पर्यावरण खात्‍यातने अट घातली होती की, या जागेचा वापर कोणत्‍याही प्रकारच्‍या व्‍यवसायीक कारणासाठी करण्‍यात येणार नाही तसेच या जागेत कोणतेही बांधकाम करण्‍यात येणार नाही याची लेखी हमी शासनाने द्यावी. मात्र त्‍यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्‍यात होते तर पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे हे होते. त्‍यांनी का त्‍यावेळी ही लेखी हमी केंद्री पर्यावरण खात्‍याला दिली नाही. त्‍याबाबत कॅगेनेही ताशेरे ओढले होते. केंद्रातील मंत्र्यांनी मागणी करुनही तसे प्रतिज्ञापत्र तत्‍कालीन पर्यावरण मंत्र्यांनी का दिले नाही. यामागे काय स्‍वार्थ होता का ? ही जागा बिल्डरांना देण्‍याचा घाट होता का? या प्रकरणी मुख्‍यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली आहे. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.