राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडेंनी कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर बुधवारी सुनावणी झाली.
(हेही वाचा – एलॉन मस्कला ‘त्या’ निर्णयाचा होतोय पश्चाताप! ट्विट करून म्हटले…)
काय आहे प्रकरण
समीर वानखेडे यांनी स्वतः वाशीम कोर्टात दाखल होत २४ ऑगस्ट रोजी मलिकांविरोधात याचिका दाखल केली होती. यावर आज, बुधवारी सुनावणी झाली. तसेच त्यांचा जामीन अर्जदेखील कोर्टाने फेटाळला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी उद्या गुरूवारी वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Join Our WhatsApp Community