हरिद्वार धर्म संसदेत कुराणचा अपमान केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) Wasim Rizvi यांना निर्दोष मुक्त केले आहे. जितेंद्र नारायण त्यागी हे उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांनी आता हिंदू धर्म स्वीकारला आहे.
१७ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत खरखडी येथील निकेतन आश्रमात या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना रिझवी (Wasim Rizvi) यांनी कुरणाचा अवमान केल्याचा आरोप नदीम अली यांनी केला. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर रिझवी (Wasim Rizvi) यांच्यावर ‘द्वेषपूर्ण भाषण’ केल्याचा आरोप केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३अ (वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे) आणि कलम २९८ (प्रार्थनास्थळाचा अपमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण ९ जणांवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप होता.
(हेही वाचा Murshidabad Violence : झियाउल शेखला अटक; हिंदू पिता-पुत्राची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथवले होते)
याच प्रकरणी डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती आणि ‘सूरदर्शन न्यूज’ वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी वसीम रिझवी (Wasim Rizvi) उर्फ जितेंद्र त्यागी यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते, परंतु सीजेएम अविनाश श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने त्यांना संशयाचा फायदा दिला. त्यांना जानेवारी २०२२ मध्ये अटकही करण्यात आली होती, पण मे महिन्यात त्यांना जामीन मिळाला. रिझवी (Wasim Rizvi) उर्फ जितेंद्र त्यागी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.
Join Our WhatsApp Community