प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच; Yogi Adityanath यांचा विधानसभेत खुलासा

59

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पाणी प्रदूषित (Prayagraj
Water pollution) नसून शुद्धच असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. केंद्रीय प्रदूषण मंडाळाने प्रयागराजचे पाणी शुद्ध नसल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Arbitration) सादर केलाय. त्यापार्श्वभूमीवर योगींनी विधानसभेत बुधवारी हा खुलासा केला आहे. (Yogi Adityanath)

यासंदर्भात योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रयागराजमध्ये (Prayagraj) ड्रेनेज सिस्‍टिम उत्तमरित्‍या काम करत असून सर्व ड्रेनेज पाईपलाईनमधील पाणी पूर्ण शुद्धीकरण करुनच नद्यांमध्ये सोडले जाते. उत्तरप्रदेश प्रदूषण महामंडळ  (Uttar Pradesh Pollution Corporation) दररोज पाण्याची गुणवत्ता तपासते. संगमाजवळील आजच्या पाण्याचा बायोकेमीकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) 3 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्‍सिजनचे प्रमाण 8 ते 9 टक्क्यांपर्यंत आहे. संगमावरील पाणी केवळ स्‍नानासाठीच नाही तर ‘आचमन‘ घेण्यासाठीही अगदी शुद्ध आहे असा दावा त्‍यांनी केला. त्‍याचबरोबर पाण्यातील मानवी मलमुत्रामुळे कॉलीफॉर्म वाढल्‍याचा दावाही त्‍यांनी फेटाळला. त्‍यांनी सांगितलेकी हे प्रमाण प्रति 100 एमएल पाण्यात 2500 एमपीएनपेक्षा कमीच आहे.

राष्‍ट्रीय हरीत लवादानेही महाकुंभवेळी पाण्यातील मानवी मलमुत्राचे प्रमाणही नियमानुसार असून प्रति 100 एमएल मध्ये 2000 पेक्षा कमी एमपीएन एवढे आहे असे स्‍पष्‍ट केले आहे. सेंट्रल पोल्‍युशन कंट्रोल बोर्डाने (सीपीसीबी) प्रति 100 एमएल पाण्यात 2000 एमपीएन (Most Probable Number )प्रमाणाला काही अपवादात्‍मक वेळा परवानगीयोग्‍य आहे असे म्‍हटले. हे प्रमाण 500 एमपीएन अगदी योग्‍य आहे. योगी आदित्‍यनाथ यांनी या गोष्‍टींचा संदर्भ घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Pramod Mahajan Art Park ला बनवले बकाल; आयुक्तांना स्वत: भेट देऊन द्यावे लागले निर्देश)

महाकुंभला (Maha Kumbh 2025) बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला. काही लोक महाकुंभ मेळा बदनाम करण्यासाठी कॅम्‍पेनिंगच चालवत आहेत असेही ते म्‍हणाले. केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्रयागराजमध्ये 73 ठिकाणांहून पाण्याचे नमूने गोळा करुन त्‍याची चाचणी केली होती. यासाठी सहा वेगवेगळे निकष लावले होते. पाणि किती आम्‍लयुक्‍त किंवा अल्‍कधर्मीय आहे याची तपासणी करुन हा अहवाल राष्‍ट्रीय हरीत लवादाकडे दाखल केला होता. हरीत लवादापुढे प्रयागराजमधील पाण्यात मलनिसाःरण करु नये अशा मागणीची याचिका दाखल आहे. त्‍यावर सध्या सुनावणी सुरु आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.