Wayanad By Election : सत्यन मोकेरी यांच्यामुळे वायनाडचा गड प्रियंका गांधींना अवघड जाणार का?

118
Wayanad By Election : सत्यन मोकेरी यांच्यामुळे वायनाडचा गड प्रियंका गांधींना अवघड जाणार का?
  • प्रतिनिधी 

वायनाडची पोटनिवडणूक (Wayanad By Election) एकतर्फी होईल असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र सीपीआयकडून सत्यन मोकेरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना वायनाडचा गड राखणे अवघड जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण प्रियंका गांधी यांच्यासाठी सध्यातरी ही निवडणूक एकेरी वाटत असली तरी सीपीआयचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि मोकेरी यांच्या पाठिशी असलेला अनुभवही विसरून चालणार नाही. मोकेरी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेच राहुल गांधी यांना इंदिरा गांधी यांच्या पराभवाची आठवण करून दिली आहे. तसेच प्रियंकाही पराभूत होऊ शकतात, असे सांगताना त्यांनी २०१४ मध्ये आपला केवळ २० हजार मतांनी पराभव झाल्याचेही ठणकावून सांगितले.

(हेही वाचा – Onion Express Train : कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी लासलगावहून ‘कांदा एक्स्प्रेस’ थेट दिल्लीला रवाना)

वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रियंका गांधी या राहुल गांधींचा मताधिक्याचा रेकॉर्ड मोडणार की त्यांना निवडणूक जड जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सीपीआयकडून सत्यन मोकेरी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राहुल यांना इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली. त्यामुळे वायनाडमध्ये सीपीआयकडून प्रियंका यांच्याविरोधात ताकदीने निवडणूक लढवली जाणार, हे स्पष्ट झाले आहे. (Wayanad By Election)

(हेही वाचा – बालविवाह रोखण्यासाठी जागरूकता हवी, कायद्यात अनेक त्रुटी; Supreme Court नेमकं काय म्हणालं?)

मोकेरी केरळमधील ज्येष्ठ नेते

सत्यन मोकेरी हे सीपीआयचे केरळमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा केवळ २० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. तसेच ते १९८७ ते २००१ या कालावधीत नादापुरम विधानसभा मतदारसंघाचे आमदारही होते. वायनाडमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून एका निवडणुकीचा अनुभवही त्यांच्या पाठिशी आहे. (Wayanad By Election)

पहिलीच निवडणूक

प्रियांका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड केली आहे. या मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी तब्बल सव्वा चार लाख मतांनी विजय मिळवला होता. पण रायबरेलीतूनही त्यांनी विजय मिळवल्याने या मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. (Wayanad By Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.