-
नवी दिल्ली प्रतिनिधी
“दिल्लीत आमची लाडकी बहीण शपथ घेणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला संधी दिली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.
शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना सांगितले की, “मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी FRP (किंमत हमी) संदर्भात माझी भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे माझे सहकारी होते. आम्ही टीम म्हणून काम करत होतो आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला.”
(हेही वाचा – २०० कोटींचा आकडा गाठण्यापूर्वी ‘Chhaava’ च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी !)
शेतकऱ्यांसाठी सरकार ठाम
“आमचं सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत,” असे स्पष्ट करताना शिंदे (Eknath Shinde) यांनी एक रकमी एफआरपी (FRP) लागू करण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. “शेतकरी केंद्रबिंदू मानूनच आम्ही काम करतो. त्यांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत राहू,” असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community