याधीचे सर्व विक्रम मोडीत १०० दिवसांत ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ग्रामविकास विभागाने ठरवले आहे. आम्हीही सरकार स्थापन करताना अनेकांचे विक्रम मोडले, असा मिश्किल टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी लगावला.
(हेही वाचा – … म्हणून रविकांत तुपकरांचे अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित)
अमृत महाआवास अभियान-२०२२ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. शिंदे म्हणाले, २०२४ पर्यंत सर्वांसाठी घरे, हा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने १०० दिवसांत ५ लाख घरांचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यांनी हा विक्रम रचल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. काही लोक लपूनछपून कारभार करतात. आम्ही कमी दिवसांत जास्त निर्णय घेण्याचा विक्रम केला. राज्याचा सर्वांगीण विकास हेच अमच्यापुढील टार्गेट आहे. आमचा कोणताही पर्सनल अजेंडा नाही. उपरोक्त योजनेत जे बसत नाहीत, त्यांच्यासाठी दुसरी योजना आणण्याचा विचार आहे. महाराष्ट्रात कुणीही बेघर राहणार नाही, यासाठी आम्ही काम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचा मानस
बेघराना २०२२ पर्यंत घर देण्याचे लक्ष पंतप्रधानांनी आखून दिले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात त्याची वेगाने अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवीन धोरण आखले आहे. आवश्यकता भासल्यास राज्यासाठी अशीच आणखी एक योजना तयार करू. पण एकही बेघर यापासून वंचित राहता नये. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचा आमचा मानस आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community