राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान मुंबईतील एका कार्यक्रमात केल्यावर राज्यपालांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
( हेही वाचा : ‘काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’ पडळकरांचे टीकास्त्र)
शेलारांचे ट्वीट
राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये असे ट्वीट आशिष शेलारांनी केले आहे.
मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो.
त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 30, 2022
दरम्यान, राज्यपालांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांना नारळ देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community