हिंदू धर्म आम्हाला शिकण्याची गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आम्ही दिलेली वचने पूर्ण करणार आहोत. तुम्ही असेच जर आमच्या पाठीशी उभे राहिलात तर नवा महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जी कामं करत आहोत ती तुम्हाला मान्य आहेत का? मान्य असतील तर दोन्ही हात वर करुन आम्हाला आशिर्वाद द्या. नांदेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते मीडियाशी बोलत होते.
राज ठाकरे यांच्या दौ-याबद्दल विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले आहे. तसेच आपण संपलेल्या विषयावर बोलत नाही. जेव्हा संघर्ष सुरु होता, तेव्हा आम्ही आयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपला आहे. आता आशिर्वाद घ्यायला जाणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही प्रसिद्धी करत नाहीत
आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोरोनाचे एवढे मोठे संकट आले. पण आम्ही थांबलो नाही. शेतक-यांची कर्जमाफी केली, रायगडला सहाशे कोटी रुपये दिले. पण त्याची प्रसिद्धी केली नाही. पुढच्या वेळेला उपजिल्हा रुग्णालयाचे काम करणा-या मंडळींचा सत्कार करु, असं आश्वासनही आदित्य ठाकरेंनी यावेळी दिले.
( हेही वाचा: कोणाला कितीही विरोध करु द्या आम्ही अयोध्येत जाणारच; मनसे ठाम )
…म्हणून करणार अयोध्येचा दौरा
राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-यासाठी उत्तर प्रदेशातून प्रचंड विरोध होत आहे. आपण त्यावर बोलणार नाही. अयोध्याचा दौरा राज्यातील विकासाच्या कामांसाठी आणि प्रभूरामचंद्रांचे आशिर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.