उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडाचे पडसाद आता सामाजिक माध्यमांवरही उमटू लागले आहेत. समाजातील विविध घटनांवर परखडपणे भाष्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हीचा एक व्हिडीओ उरणमधील Love Jihad च्या घटनेवर सोशल मीडियात प्रसारित झाला आहे. त्यात तिने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना हिंदूंना अशा घटनांविरुद्ध लढण्यासाठी स्वतःला सिद्ध व्हावे लागेल, आपल्या मुलींचे रक्षण आपल्यालाच करावे लागेल, असे केतकीने म्हटले आहे.
घटनेचा सोशल मीडियात होतोय निषेध
२७ जुलैच्या पहाटे यशश्री शिंदे नामक २२ वर्षीय मराठी तरुणीचा मृतदेह उरणमधील कोर्टनाका परिसरातील पेट्रोल पंपाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाची नोंद करून अधिक तपास केला असता ही घटना प्रेमप्रकरणातून (Love Jihad) घडली असल्याचे निदर्शनास आले. यशश्री हिचा खून तिच्या मुस्लिम प्रियकराने केला असल्याचे उघड झाल्यावर हे प्रकरण लव्ह जिहादचे (Love Jihad) असल्याचे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनीही पोलीस स्थानकावर मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला असून खुन्याला फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. सामाजिक संकेतस्थळांवरसुद्धा तरुण वर्ग या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. एप्रिल महिन्यात कर्नाटकातील नगरसेवकाच्या मुलीची हत्या लव्ह जिहादमधून (Love Jihad) करण्यात आली होती, तसे या हत्येमागेही लव्ह जिहादचेच षडयंत्र असल्याचे मत तरुण व्यक्त करत आहेत. वाढती लव्ह जिहादची प्रकरणे लक्षात घेऊन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने राज्यात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ पारित केला त्याप्रमाणे महाराष्ट्रातही अशा प्रकारे कायदा करण्याची सामाजिक संकेतस्थळांवर तरुणांकडून केली जात आहे.
(हेही वाचा मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची भीती; Sharad Pawar यांचं वादग्रस्त वक्तव्य)
काय म्हटले केतकीने?
यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणी आता केतली चितळेनेही एक व्हिडीओ प्रसारित करून तीव्र संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लव्ह जिहाद केवळ पश्चिम बंगाल, केरळ, बिहार येथील मुस्लिम बहुल भागांत होतोय असे नव्हे, किंवा देशातील ग्रामीण अथवा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागांत होत आहे असे नव्हे, तर ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत, अशा ठिकाणी लव्ह जिहाद होत असल्याचे ती व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. आपल्या मुलींचे मृतदेह कधी फ्रिजमध्ये, कधी कपाटात तर कधी समुद्रात सापडत आहेत.आपल्या बाजूने पोलीस किंवा प्रशासन नाही त्यामुळे आपल्या मुलींचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे. पूर्वीचे लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, आपल्याला आता आपल्या धर्मासाठी लढायचे आहे असे आवाहनही तिने या व्हिडिओद्वारे केले आहे.
Join Our WhatsApp Community