CM Eknath Shinde : योजना आम्ही पण घेऊन जायचो; पण इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकेला प्रत्युत्तर

184
CM Eknath Shinde : योजना आम्ही पण घेऊन जायचो; पण इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकेला प्रत्युत्तर
CM Eknath Shinde : योजना आम्ही पण घेऊन जायचो; पण इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टीकेला प्रत्युत्तर

‘उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील होते. (CM Eknath Shinde) त्यावेळी त्यानी काय केले’, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ”अडीच वर्षांमध्ये तुम्ही घोषणाही केली नाही. आम्ही सर्व घोषणा विचारपूर्वक केल्या आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी काम केले आहे. ज्यांना घोषणा करता येत नाही, जे मंत्रालयात गेले नाही, ते काय आमच्यावर टीका करणार ?”, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – IND Vs SL Final Asia Cup : श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक)

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ”त्यांच्या मंत्रिमंडळात मी पण होतो. अजितदादा होते. आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो. सहकाऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास असलेला, इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही सरकार पलटवले नसते, तर राज्य पाठीमागे गेले असते. आज पुन्हा राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे.” (CM Eknath Shinde)

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, ”जोपर्यत बॉस ठरवतो, तोपर्यंत काहीच होत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही मंत्री असलो, तरी जो पर्यत बॉस ठरवत नाही, तोपर्यत काहीच होत नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणाऱ्या नमो ११ कलमी कार्यक्रमाविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात कशा प्रकारे योजना डावलल्या जात असत याविषयी वास्तव सांगितले. (CM Eknath Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.