लोकसभा निवडणुकीत आम्ही ओव्हर कॉन्फिडंसमध्ये होतो आणि महाविकास आघाडी देखील होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा फेक नरेटीव्हचा फुगा एका मिनिटांत फोडला आणि पूर्ण महाविकास आघाडी धुवून काढली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लगावला. तसेच शरद पवारांनी संघाचे कौतुक केले त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
आम्ही ठरवले होते की सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू. त्यामुळे जरा कालावधी लागला. यात कधी एकनाथ शिंदे नाराज, कधी अजित पवार नाराज. आता माध्यमांना देखील दोष देता येत नाही, त्यामुळे बातमी मिळाली तर ठीक नाहीतर काहीतरी बनवावी लागते. कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो. पण मला असे वाटत नाही की त्यात फार काही अटी शर्ती टाकल्या आणि शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा Veer Savarkar अवमान प्रकरणी राहुल गांधी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर)
एकनाथ शिंदे फारसे हसत नाहीत
शिंदे साहेबांच्या समोर तोच प्रश्न होता की मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री व्हावे की नाही. त्यामुळे मी त्यांना माझा अनुभव सांगितला, मी म्हटले की तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. माझा पक्ष तर असा आहे? दिल्लीत वरिष्ठ आहेत. पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा आहे. विभाजन झाल्यानंतर चांगले यश मिळालेला तुमचा पक्ष आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले पाहिजे. आता तुम्ही माझे चेहऱ्यावर नेहमी हास्य पाहिले असेल, पण त्यांचा चेहरा असा आहे की त्यांच्या चेहऱ्यावर फारसे हास्य नसते. पण ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांचा तसा चेहरा होता पण तेव्हा कोणी बोलले नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.