सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यावर कालपर्यंत राज्य केंद्रावर आरोप करत आहे, केंद्र राज्यावर आरोप करत आहे, त्यामुळे आता हा प्रकार थांबणार असून केंद्राशी समन्वय साधून अधिकाधिक सुविधा राज्यात कशा मिळतील याकडे आमचे प्रयत्न असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुण्यात आणखी एक जम्बो कोविड सेंटर!
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर अजित पवार म्हणाले की, आम्ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी अधिकाधिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पुण्यासाठी प्रसंगी सैन्यातील रुग्णालयाच्या खाटा उपलब्ध करून देण्यात येतील, पुण्यात केंद्राकडून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येतील, असेही जावडेकर म्हणाले असल्याचे पवार म्हणाले. ससून रुग्णालयात ५०० खाटांसह एका जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा : श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?)
दुसऱ्या लाटेत गांभीर्य कमी!
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना कोरोनाविषयी प्रचंड भय होते, तसेच या संसर्गाला थांबवायचे कसे हे माहित नव्हते, म्हणून गोंधळ मजला होता, मात्र आता दुसऱ्या लाटेत तेवढी भीती निर्माण झाली नाही, त्यामुळे अनेकजण बाधित असूनही बिनधास्त फिरत आहेत, परिणामी ती व्यक्ती सगळीकडे फिरून संसर्ग वाढवत आहे, त्यामुळे कोरोनाची साखळी मोडणे महत्वाचे आहे. त्यासाठी व्यापारीही सहकार्य करतील. त्याकरता प्रशासन व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community