पुण्यातील लोकसभेच्या जागेवर सध्या दावे प्रतिदावे केले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यातील लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार असा दावा केला होता. याच दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी प्रतिदावा करत काँग्रेसच्या मर्मावरच बोट ठेवले आहे. काँग्रेसपेक्षा जास्त ताकद राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे पुण्याची जागा आम्हीच लढवणार, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘पुण्याची जागा राष्ट्रवादीच लढवेल. आम्ही दोघांनी सांगून काय उपयोग आहे का? वरच्या स्तरावर चर्चा होईल. एक आहे, आज किती काँग्रेस काहीही म्हटली, तरी पुण्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तुम्ही म्हणालं कशी? तर आमदार किती निवडून आलेत ते बघा, आमदारांना पडलेली मत बघा. सहा वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती. गेले अनेक वर्ष पुण्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठल पाटील, आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये होतो. विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव चेतन तुपे हडपसरचे आमदार आहेत. त्या विठ्ठल पाटलांनी जिंकली होती. त्यांच्यानंतर ती जागा काँग्रेसला दिल्यानंतर कधीही ती काँग्रेसने जिंकलेली नाही. मागच्या वेळेस कोण निवडून आले, गिरीश बापटसाहेब. आमचा आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. लाखांच्या मत फरकांनी तो पराभूत झाला. त्याच्याआधी अनिल शिरोळे निवडून आले, ही गोष्ट कधीची २०१४ची. तेव्हाही आमचे आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. ते काँग्रेसचे होते. त्याच्या आधीही भाजपचेच निवडून आले.’
(हेही वाचा – New Parliament Building : पूजा-अर्चना आणि हवन…अशा प्रकारे देशाच्या नवीन संसद भवनाचे झाले उद्घाटन)
‘आता सातत्याने निवडणुकीला उभ राहिल्यानंतर तिथे ते पराभूत होतात, अशावेळेस मी मध्येच असे म्हटले की, मविआच्या जागा वाटपामध्ये गेले अनेकदा उभं करून जर एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार पराभूत होत असेल, तर तिथे त्यांच्या मित्रपक्षातील कोणाची ताकद असेल तर त्याला ती जागा दिली पाहिजे. आणि निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हालाच पुण्याची जागा मिळावी ही आमची इच्छा आहे,’ असे अजित पवार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community