नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी आज भेट दिली. पोलीस आयुक्तांशी बैठक घेत फडणवीसांनी सर्व आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं त्यांना 3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल, असा थेट इशारा फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis ) दिला आहे.
हेही वाचा-Disha Salian Case : आदित्य ठाकरेंवर गु्न्हा दाखल करण्याचा निर्णय २ एप्रिलला
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस (CM Devendra Fadnavis ) म्हणाले, “पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. ”
“आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार आहे. जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत. मोठ्या प्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांनी दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 68 पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केलं, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल.” (CM Devendra Fadnavis )
हेही वाचा- Pakistani spy : पाकिस्तानी गुप्तहेराची 17 वर्षांची शिक्षा पूर्ण ; आता पुढे काय ?
ज्या लोकांचं नुकसान झाले आहे, गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या तीन-चार दिवसांत नुकसान भरपाई मिळेल. नागपूरमधील संचारबंदीमुळे जे काही निर्बंध आहेत, त्यामुळे जनजीवन आणि व्यापारावर परिणाम झाला आहे. आता वातावरण शांत असल्याने यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पोलीस पूर्णपणे सजग राहतील. दंगलीत झालेले नुकसानीचे पैसे दंगेखोरांकडून वसूल केले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा- Fire News : लंडनमधील वीज केंद्राला आग ; सर्वात मोठे विमानतळ बंद , 1300 उड्डाणे रद्द
नागपूर हिंसाचाराची सूत्रे बांगलादेशातून हलवण्यात आली की नाही, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, या दंगलीचे मालेगाव कनेक्शन स्पष्ट आहे. दंगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अभद्र व्यवहार झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, मी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यांनी असा कोणताही अभद्र व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. महिला पोलिसांवर दंगलखोरांनी दगडफेक केल्याचे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community