जम्मू काश्मीरमधून (Jammu and Kashmir) 370 कलम हटविल्यानंतर आणि त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर फुटीरतावादी नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांचा तीळपापड झाला आहे. फारूख अब्दुल्ला यांनी केंद्रातल्या मोदी सरकारलाच धमकी दिली आहे. ”पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू केली नाहीत, तर जम्मू-काश्मीरमध्ये गाझा आणि पॅलेस्टाईन सारखाच रक्तपात होईल”, अशी दर्पोक्ती अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी केली आहे.
(हेही वाचा – MIDC : मालकी हक्क नसलेल्या ३४ हेक्टर भूखंडासाठी ‘एमआयडीसी’ने दिले ५ कोटी; ‘कॅग’च्या अहवालात धक्कादायक उघड)
दहशतवाद थांबवल्याशिवाय चर्चा नाही – मोदी सरकारची ठाम भूमिका
दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकिस्तानशी कुठलीही चर्चा नाही, अशी ठाम भूमिका मोदी सरकारने घेतली. त्याचबरोबर जम्मू – काश्मीर मधले 370 कलम (Article 370) देखील हटवले आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे विभाजन करून लडाख आणि जम्मू – काश्मीर हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार केले. त्यामुळे डॉ. फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पाकिस्तान प्रेमाचे राग आळवण्यास सुरुवात केली आहे.
वाजपेयींच्या विधानाचे दिले दाखले
”अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) म्हणाले होते, ”तुम्ही मित्र बदलू शकता; पण शेजारी बदलू शकत नाही. पाकिस्तान आपला मित्र नसेल; पण शेजारी आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी चर्चा केलीच पाहिजे. पाकिस्तान मध्ये नवाज शरीफ पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी भारताशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. मग भारत सरकारच आपल्या अडेल भूमिकेवर का टिकवून आहे ??”, असा युक्तीवाद अब्दुल्लांनी केला आहे. तसेच ‘पाकिस्तानशी चर्चा केली नाही, तर जम्मू – काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गाझा (Gaza) आणि पॅलेस्टाईन (Palestine) सारखाच रक्तपात होईल’, अशी धमकी दिली.
हेही पहा –