पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप असून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका नेत्याने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप आहे. ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली.
बसून राष्ट्रगीत गायले, मग ते मधेच सोडले
ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली आणि ते पूर्ण न करता 2-4 ओळी गाऊन थांबवल्याचा आरोप भाजप नेते प्रतीक कर्पे यांनी केला आहे. प्रतीक कर्पे यांनी ट्विट केले, ‘हा राष्ट्रगीताचा अपमान नाही का? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खाली बसून राष्ट्रगीत सुरू करत असताना उपस्थित तथाकथित विचारवंत काय करत होते? एवढेच नाही तर त्यांनी राष्ट्रगीत पुढे म्हणायला सुरुवात केली आणि अचानक मध्येच थांबल्या.
Isn’t this demeaning National Anthem ?
What were the so called intellectuals present doing
When CM @MamataOfficial started National Anthem in a sitting position
Not only that Then she went ahead and abruptly stopped it in between #MamataBanerjee pic.twitter.com/icyU3kv5bn
— Pratik Karpe (@CAPratikKarpe) December 1, 2021
भाजप बंगालनेही साधला निशाणा
यासोबतच भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटनेही राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता यांना लक्ष्य केले. भाजप बंगालने ट्विट करून म्हटले आहे की, ‘ममता बॅनर्जी आधी बसल्या, नंतर उठल्या आणि मध्येच राष्ट्रगीत गाणे थांबवले. मुख्यमंत्री असताना त्यांनी बंगालची संस्कृती, राष्ट्रगीत आणि देशाचा तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला आहे.
Mamata Banerjee was sitting down at first then stood up and stopped singing halfway the national anthem of India.
Today, as a Chief Minister, she has insulted the culture of Bengal, the national anthem and the country, and the Gurudev Rabindranath Tagore! pic.twitter.com/2pme2qCg23
— BJP Bengal (@BJP4Bengal) December 1, 2021
(हेही वाचा: ओमिक्राॅनचा धोका! राज्याच्या निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप )
Join Our WhatsApp Community