पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, भाजप-तृणमूलच्या नेत्यांमध्ये हाणामारी

79

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा हिंसाचार पहायला मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधला वादाने आता गंभीर रुप धारण केले आहे. जिल्ह्यातील भाजपच्या नबन्ना अभियानादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. तसेच यावेळी पोलिसांसोबत सुद्धा कार्यकर्त्यांची झटापट झाली. या हिंसाचारानंतर पोलिसांकडून अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

भाजप नेते उपस्थित

भाजपने मंगळवारी नबन्ना अभियानांतर्गत कोलकाता येथे अनेक ठिकाणी आंदोलन केले. यादरम्यान भाजपने मंगळवारी कोलकाता येथील सचिवालयावर देखील मोर्चा काढला. यावेळी भाजपचे बंगालमधील सर्व नेते आणि कार्यकर्ते कोलकाता आणि हावडा येथे पोहोचले. यामध्ये विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासारखे बडे नेते देखील उपस्थित होते.

(हेही वाचाः ‘सांग सांग भोलानाथ… हा दंड पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?’, शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा)

पोलिसांनी घेतले ताब्यात

ममता बॅनर्जी सरकारवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरुन भाजपने हा मोर्चा काढला होता. त्यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यावेळी तृणमूलचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये तणाव निर्माण होऊन तुफान हाणामारी झाली. बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली. त्यामुळे जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शुभेंदू अधिकारी,लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.