West Bengal violence : मतमोजणी केंद्राबाहेर स्फोट; आत्तापर्यंतच्या हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू

187
West Bengal violence : मतमोजणी केंद्राबाहेर स्फोट; आत्तापर्यंतच्या हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील (West Bengal violence) ६४,८७४ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी झालेल्या मतदानाचा आज (मंगळवार ११ जुलै) निकाल लागणार आहे. अशातच पश्चिम बंगालमधील २४ परगणा येथील डायमंड हार्बरमधील एका मतमोजणी केंद्राबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal violence) या शनिवारी म्हणजेच ८ जुलै रोजी पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे ६६.२८ टक्के मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. यावेळी राज्यात हिंसाचाराच्या भीतीमुळे १.३५ लाख जवान तैनात करण्यात आले होते, त्यानंतरही मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रक्तरंजित चकमकी झाल्या. यावेळी अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आणि मतदान केंद्रांची तोडफोड करण्यात आली.

(हेही पहा – नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रिपद?; उपसभापती पदासाठी ‘या’ नावाची चर्चा)

मिळालेल्या माहितीनुसार ८ जून ते ७ जुलैपर्यंत या हिंसाचारात १९ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ८ जुलै रोजी वेगवेगळ्या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. आज ३२ दिवसांनंतर राज्यातील हिंसाचारात मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने टीएमसीला घेरले आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांच्यावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही म्हटले की, बंगालमधील हत्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचवेळी टीएमसीनेही भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.