West Bengal violence : पुन्हा ६९७ बूथवर होणार मतदान

144
West Bengal violence : पुन्हा ६९७ बूथवर होणार मतदान

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal violence) या शनिवारी म्हणजेच 8 जुलै रोजी पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 66.28 टक्के मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. यावेळी राज्यात हिंसाचाराच्या भीतीमुळे 1.35 लाख जवान तैनात करण्यात आले होते, त्यानंतरही मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रक्तरंजित चकमकी झाल्या. यामध्ये 18 विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आणि मतदान केंद्रांची तोडफोड करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील 4 जिल्ह्यांतील 697 बूथवर आज (सोमवार 10 जुलै) पुन्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये मालदा, मुर्शिदाबाद, पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना यांचा समावेश आहे. आज होणाऱ्या निवडणुकीत मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक 175 बूथ आहेत, तर मालदामध्ये 112 बूथ आहेत.

(हेही वाचा – Congress : आता कॉंग्रेसची बारी! १६ आमदार फुटणार; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी सुरू)

सुरक्षा दल वेळेत तैनात करण्यात आले नाही – निवडणूक आयुक्त

निवडणुकीदरम्यान हिंसाचार पसरवल्याच्या आरोपांबाबत बंगालचे निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा म्हणाले की, निवडणुकीदरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. बंगालमध्ये केंद्रीय दल वेळेत तैनात करू शकले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

या हिंसाचारानंतर भाजपने टीएमसीला घेरले. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांच्यावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही म्हटले की, बंगालमधील हत्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचवेळी टीएमसीनेही भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. सध्या 11 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.