पश्चिम बंगालमधील (West Bengal) मुर्शिदाबाद येथे धर्मांध मुसलमानांचे तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार वाढतच आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात तेथील मुसलमानांनी आंदोलनाच्या नावाखाली स्थानिक हिंदूंवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात तेथील तीन हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. मुर्शिदाबाद येथे मुसलमानांचे कौर्य आणि ममता सरकारचे मुसलमानांना मिळत असलेले समर्थन यामुळे आता मुर्शिदाबाद येथून हिंदूंचे पलायन सुरु झाले आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) दुसरा काश्मीर होण्याच्या वाटेवर आहे.
१९९० मध्ये काश्मीरमध्ये मुसलमानांनी काश्मिरी हिंदू पंडितांना रातोरात काश्मीर सोडून जा, अन्यथा ठार करू, असे फर्मान मुसलमानांनी काढले होते. त्याआधी मुसलमानांनी तेथील अनेक हिंदूंची हत्या केली होती. त्यामुळे लाखो हिंदू एका रात्रीत सगळे सोडून नेसत्या वस्त्रानिशी काश्मीर सोडून गेले. आता तीच वेळ पश्चिम बंगालमधील (West Bengal) मुसलमानांमुळे स्थानिक हिंदूंवर आली आहे. मुर्शिदाबाद येथून हिंदूंचे पलायन सुरु झाले आहे.
(हेही वाचा West Bengal Violence : रस्त्यांवर जाळपोळ, इंटरनेट बंद … ; मुर्शिदाबाद हिंसाचाराचे काही Unseen Photos)
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात धर्मांध मुसलमानांनी दंगल करून तीन हिंदूंची निर्घृण हत्या केली. प्रचंड जाळपोळ करून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे मुर्शिदाबाद आणि जांगीपूर इथल्या हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. हिंदूंना आपापली घरे, व्यवसाय सोडून पलायन करावे लागले. याबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असताना पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी सरकारच्या मुस्लिम मंत्र्यांनी मात्र त्यावर लिपापोती करत बंगालमध्ये शांतता असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वक्फ सुधारणा कायद्यावरून मुसलमानांनी मुर्शिदाबाद आणि जांगीपुरमध्ये दंगल करूनही ममता सरकार जागेवरूनही हलले नाही. शेवटी कोलकाता उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटून आता हिंसाचारग्रस्त भागात लष्कराला पाचारण करून दंगल आटोक्यात आणा, असे सांगावे लागले. परंतु पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फरीद हकीम यांनी मात्र ही घटना किरकोळ असल्याचीच मखलाशी केली. मुर्शिदाबादमधली घटना निंदनीय आहे, पण बंगालमधले वातावरण सुरक्षित आहे. त्यामुळे तिथले हिंदू बंगालमध्येच (West Bengal) स्थलांतर करत आहेत. ते इतर राज्यांमध्ये जात नाहीत, अशी मुक्ताफळे फरीद हकीम यांनी उधळली. आपल्या मुक्ताफळांच्या समर्थनार्थ त्यांनी उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील घटनांचा हवाला द्यायचा प्रयत्न केला.
Join Our WhatsApp Community