90 च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे वास्तव दाखवणारा ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या चित्रपटाला काही लोक जातीय रंग देत आहे. या चित्रपटाला अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आले आहे. आता हा चित्रपट पश्चिम बंगालमध्येही करमुक्त व्हावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे ‘द काश्मिर फाईल्स’ च्या वादात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली कहाणी ही खोटी आहे. कोणीही हा चित्रपट पाहू नये, असे बॅनर्जी म्हणाल्या.
चित्रपट करमुक्त करावा
द काश्मिर फाईल्स हा चित्रपट भाजपाशासित अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांत या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशानंतर बंगालमधील भाजप नेत्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली होती. तसेच, पश्चिम बंगालमध्येही हा चित्रपट करमुक्त व्हावा, अशी मागणी केली जात आहे.
( हेही वाचा … तर पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही! )
अन्यथा परिणाम वाईट
पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटाची कहाणीच खोटी असल्याचं म्हटलं आहे. तसेच, या कहाणीमध्य काहीही तथ्य नसल्याचही त्या म्हणाल्या. हा चित्रपट पाहण्यासाठी कोणीही चित्रपटगृहात जाऊ नये, असेही बॅनर्जी म्हणाल्या. द्वेष आणि हिंसाचार पसरवण्यासाठी असे चित्रपट जाणीवपूर्वक बनवले गेले आहेत. असे चित्रपट पैसे देऊन बनवले जातात, त्यामुळे अशा चित्रपटांना टॅक्स फ्री करण्यात काहीच अर्थ नाही. तसेच हा चित्रपट पाहून कोणीही बंगालमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, असंही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community