प. बंगालमध्ये कधी शांतता नांदणार? केंद्रीय गृहमंत्री Amit Shah म्हणाले…

121
पश्चिम बंगालमध्ये कायम अशांतता असते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धर्मांध मुसलमानांच्या कारवाया सुरु असतात, या परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये शांतता तरच लाभेल जेव्हा बांगलादेशी घुसखोरी थांबेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मांडले.
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील नवीन पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग आणि कार्गो गेटचे उद्घाटन करण्यासाठी अमित शाह पेट्रापोल लँड पोर्टवर आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी 2026 मध्ये राज्यातील जनतेकडून राजकीय बदलाची मागणी शाह यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल, असे अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.