HL : WFI Election : Brijbhushan Sharan यांच्यासाठी कुस्ती महासंघाचा डाव किती सोपा, किती कठीण?

WFI Election : Brijbhushan Sharan यांनी कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. पण, यावेळी गड राखण्यात ते यशस्वी होतील का? कारण, त्यांच्या विरोधात आहे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचं पॅनल. आणि याच पॅनलला सरकारी यंत्रणेचाही पाठिंबा असल्याचं बोललं जातंय.

127

विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी केलेल्या आंदोलनामुळे भारतीय कुस्ती महासंघाची १२ ऑगस्टला होणारी निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. त्यातच नुकतेच निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या अर्जदारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. आणि त्यानुसार, ही निवडणूक ब्रिजभूषण शरण यांच्यासाठी सोपी जाणार नाही असंच दिसतं.

दुसरीकडे, ब्रिजभूषण यांनी मात्र निवडणुकीत आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. एकट्या अध्यक्षपदासाठी चार जणांनी दावा ठोकला आहे. यात दोन गडी ब्रिजभूषण यांच्या जवळचे आहेत. तर इतर दोघांना सरकारचा पाठिंबा आहे. महिला खेळांडूंचा विनयभंग आणि लैंगिक छळाच्या आरोपावरून ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं जनमत तयार होत असताना स्वत: शरण यांनी निर्दोष असल्याचा दावा करतानाच या निवडणुकीत आपलं पॅनल निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून आणखी काही काळ संरक्षण मिळालं आहे. आणि मिळालेल्या या वेळेत ते मतदानासाठी पात्र लोकांना फोनवर फोन करून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

शरण स्वत: भारतीय जनता पार्टीचे खासदार असले तरी यावेळी त्यांना तगडी लढत द्यावी लागू शकते. अध्यक्षपदासाठी शरण यांनी आपले निकटवर्तीय उत्तर प्रदेश संघटनेचे उपाध्यक्ष संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली संघटनेचे अध्यक्ष जय प्रकाश अशा दोघांना उभं केलं आहे. यापैकी जय प्रकाश हे माजी कुस्तीपटू आणि राष्ट्रीय विजेते आहेत. पण, या दोघांना स्पर्धा करायची आहे ती जम्मू व काश्मीरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत सिंग तसंच माजी राष्ट्रकूल पदक विजेत्या महिला कुस्तीपटू अनिता शेरॉन यांच्याशी.

(हेही वाचा CM Eknath Shinde : अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी; आमचे सरकार परफॉर्मन्स देणारे, फेसबुक लाईव्ह करणारे नव्हे)

विशेष म्हणजे अनिता शेरॉन या त्याच महिला आहेत ज्या ब्रिजभूषण यांच्याविरोधात सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या खटल्यातल्या साक्षीदार आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय एकमेव महिला उमेदवार असल्यामुळेही अनिता यांची दावेदारी लक्ष वेधून घेत आहे. अनिता ओडिशा संघटनेकडून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे या लढतीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

आणि ब्रिजभूषण यांचं आव्हानही कठीण झालं 

कुस्ती महासंघाची कार्यकारिणी पंधरा जणांची असेल. आणि अध्यक्ष पदाबरोबरच इतर पदांसाठी मिळून एकूण ५० जणांनी अर्ज केले आहेत. यात महिला कुस्तीपटूंना पाठिंबा असलेलेही चेहरे आहेत.

सध्या एकाच व्यक्तीने अनेक जागांसाठी अर्ज केले आहेत. पण, अर्ज मागे घ्यायची अंतिम मुदत ६ ऑगस्टपर्यंत आहे. आणि तोपर्यंत किती लोक अर्ज मागे घेतात त्यावरून निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होईल. एक मात्र नक्की की, यावेळी निवडणूक बिनविरोध होणार नाही. ७ ऑगस्टला निवडणुकीची अंतिम यादी प्रसिद्‌ध करण्यात येईल.

ब्रिजभूषण यांनी २५ पैकी २० राज्य संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर राजधानी दिल्लीत असंही बोललं जातंय की, ब्रिजभूषण शरण आणि अनिता शेरॉन गटांमध्ये पडद्यामागच्या वाटाधाटीही सुरू आहेत. आणि यात कार्यकारिणीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात येत आहे. ब्रिजभूषण यांच्या गटाला अध्यक्षपद देऊन कोषाध्यक्षपद तसंच सचिव पद आपल्याकडे ठेवण्यात अनिता शेरॉन गटाची तयारी असल्याचंही बोललं जातंय. १२ ऑगस्टला उशिरा अंतिम चित्र स्पष्ट होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.