कायम वादात सापडणाऱ्या आव्हाडांचे काय आहेत कारनामे?

152
ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड आणि वाद पुन्हा एकदा हे समीकरण समोर आले आहे. त्यांच्यावर या प्रकरणातही अटकेची तलवार टांगलेली आहे. याआधी आव्हाड यांना दोन वेळा अटक करण्यात आली आहे.

याआधी कोणकोणत्या प्रकरणामध्ये आव्हाड आलेले वादात? 

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता.
  • आव्हाड यांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांचा अपमान केला म्हणून अनंत करमुसे यांना त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली. त्यावेळी मंत्रीपदाच्या काळातच या प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली होती
  • ‘हर हर महादेव’ या सिनेमालाही आव्हाड यांचा आक्षेप होता. बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवर दाखविल्या गेलेल्या प्रसंगांना आव्हाड यांनी विरोध केला होता. व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला या चित्रपटाचा शो आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला होता. या आंदोलनादरम्यान एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आला आहे.

(हेही वाचा Swara Fahad Ahemad Wedding ; स्वराचा विवाह इस्लाम कबुल नाहीच; सोशल मीडियात चर्चेला उधाण)

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या केतकी चितळे आणि अजून काही तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याने जो वाद झाला त्यात देखील आव्हाडांचे नाव चर्चेत आले.
  • नोव्हेंबर 2022 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथे पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमात आव्हाडांवर एका महिलेने थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आव्हाड यांना अटक आणि नंतर सुटका करण्यात आली.
  • याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज गोट्या खेळत होते का? अफजल खान शाहिस्तेखान नसता तर शिवाजी महाराजांचा इतिहास कळला असता का ? अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा त्यांनी वाद ओढवून घेतला होता. हा वाद शांत होतो तोपर्यंतच महेश आहेर यांना मारहाण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.